1500+ मराठी उखाणे | Marathi Ukhane for Female

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही ukhane marathi for female च्या शोधात असाल तर तुम्ही योग्य जागी आला आहात कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत marathi ukhane for female, marathi ukhane for male, ukhane in marathi for female marriage, ukhane marathi funny, ukhane in marathi commend, comedy ukhane, marathi ukhane for female romantic, modern marathi ukhane for female, funny ukhane in marathi for female, naav ghene in marathi for female, ukhane marathi female जे तुम्हाला नक्की आवडतील तसेच तुम्ही इतर स्टेटस चा सुद्धा आनंद घ्या.

1. Marathi Ukhane

लावित होते कुंकु
त्यात पडला मोती
…रावां सारखे मिळाले पती
भाग्य मानू किती

चांदीच्या किचन मध्ये सोन्याचा ओटा
……. सोबत असताना नाही आनंदाला तोटा.

स्वप्नातला राजकुमार आला घोड्यावर बसून
……. रावांचे नाव घेते त्यांच्याच बाजूला बसून.

जंगलात जंगल ताडोबाचं जंगल
…….. रावांच्या संसारात सर्व राहो कुशल-मंगल.

करवंदाची साल चंदनाचे खोड
…….. रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड.

मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार
……. रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार.

सौख्याच्या वाऱ्यासंगे आनंद मेघ आले
……. रावांच्या संसारात मी अमृतात न्हाले.

2. Ukhane Marathi

रसाळ कलिंगडाचे हिरवे हिरवे साल
……रावांच्या नावाने कुंकू लावते लाल.

फुलाचा सुगंध मातीसही लागे
…….. रावांशी जुळले जन्मोजन्मीचे धागे.

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
…… रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल
…रावांचे नांव घेते तुमच्या साठी स्पेशल..

गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं
……. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर
…रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल
…… रावांचे जीवनात टाकले मी पाऊल. 

शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन
…रावांचे नांव घेते सर्वांचा मान राखुन.

3. Ukhane in Marathi

मोह नसावा पैश्याचा गर्व नसावा रूपाचा
…… बरोबर संसार करीन सुखाचा.

श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष
…रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे
……चं नाव घेते देवापुढे.

यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली
…रावांची जन्मदाती धन्य ती माऊली.

गावठी गुलाबाला सुगंध सुवास
……. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.

अभिमान नाही संपत्तीचा सर्व नाही रुपाचा
…रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा.

हळद असते पिवळी कुंकू असते लाल
…… रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.

लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा
…रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.

4. Long Marathi Ukhane For Female

मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर
…… यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.

चाफा बोलेना चाफा चालेना
……..च माझ्याशिवाय पानच हलेना.

नको मला हिरे-माणके नको आकाशातील तारे
……. हेच माझ्या जीवनाचे अलंकार खरे.

शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ती पेक्षा युक्ती ने
……रावांच नाव घेते मनापासून भक्तीने.

पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते चातकपक्षाची काया
………… रावांमुळे मिळाली सासरी सर्वांची माया.

प्रत्येक दिवस प्रेमाने करतो साजरा
……..राव आणतात मला सुगंधी मोगऱ्याचा गजरा.

वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
……. रावांची साथ मिळाली पदोपदी.

पती म्हणजे सागर पत्नी म्हणजे सरिता
……. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.

5. Navriche Ukhane

हिवाळ्यात वाजते थंडी उन्हाळ्यात लागते ऊन
……… रावांचे नाव घेते …….. ची सून.

पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार
….रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.

सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण
……रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.

आकाशी चमकते तारे जमिनीवर चमकते हिरे
…राव हेच माझे अलंकार खरे.

सुख असो दुःख असो असो दिवाळी वा पाडवा
…….. रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा.

छन छन बांगड्या छुम छुम पैंजण
……… रावांचे नांव घेते ऐका पाहू सारे जण.

नाही मी अप्सरा सुंदर तरीही मला निवडले
……… रावांचे हेच रुप मला फार आवडले.

मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध
……. रावांच्या संसारात गवसला खरा आनंद.

6. Marathi Ukhane Navari

तीन पानी बेल तीन पानांचा पळस
……… रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस.

नट्टा-पट्टा करून छान मी सजते
……… रावांचे नाव घ्यायला भारी लाज वाटते.

नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे
……. रावांना शेवटी अहोच म्हणायचे.

पजेच्या साहीत्यात उदबत्तीचा पुडा
रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा.

कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट
…… चे नाव घेते बांधते …… च्या लग्नाची गाठ.

सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान
…रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
…… च्या सवे चालते मी सप्तपदी… !!

शुभ काळी शुभ वेळी आली आमची वरात
………रावांचे नाव घेते सासरच्या घरात.

7. Marathi Ukhane Female

पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन
……… रावांचं नाव घेते …….ची सून.

वर्तन असावे नम्र, शब्द असावा गोड
………. रावांच्या संसाराला माझी आनंदी जोड.

समुद्राला आली भरती नदीला आला पूर
……. करता माहेर केले मी दूर.

अरबी समुद्रात उसळल्या लाटा
……..च्या सुख-दुःखात माझाही वाटा.

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
………चे नाव घेते ऐका देऊन कान.

वृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा
………चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा.

साधी राहणी उच्च विचारसरणी
याच तत्त्वाने वागेल ………ची गृहिणी

राज हंस पक्षी शोभा देतो वनाला
…रावांचे नाव घेते आनंद माझ्या मनाला.

8. Marathi Ukhane For Female In Marathi

चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची
…… रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.

श्रीकृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन
…रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन.

लग्नात बंधन घातले मंगळसूत्र
…… चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
…रावांचे नांव घेते पत्नी या नात्याने.

सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात
सप्तरंगाची पखरण चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात
सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात
आणि …… रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!

मंदिरात वाहाते फुल आणि पान
..रावांचे नांव घेते ठेऊन सर्वांचा मान.

हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा
…… रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!

छन छन बांगड्या छुम छुम पैंजन
…रावांचे नांव घेते ऐका सारे जण.

9. Ukhane Marathi For Female

शेल्या शेल्याची बांधली गाठ
……. नाव मला तोंडपाठ.

गोकुळा सारखं सासर सारे कसे हौशा
…रावांचे नांव घेते तिळ संक्रांतीच्या दिवशी.

नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
…… च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते

माहेर तसं सासर नाते संबंधही जुने
…रावं आहेत सोबत  मग मला कशाचे उणे.

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून
…… चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.

कपाळाचं कुंकु जसा चांदण्यांचा ठसा
….रावांचे नांव घेते सारे जण बसा.

यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
…… चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा
रावांचे नांवाचा भरला हिरवा चुडा.

10. Ukhane In Marathi For Female New

गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी
…… रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध
….रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद.

वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात
……. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.

पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेडे
…रावांचे नांव घेतांना कशाला आढे वेढे.

बारीक मणी घरभर पसरले
…… साठी माहेर विसरले.

मंदिराचे वैभव परमेश्वराची मुर्ती
….रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.

पुरूष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता
…… रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.

सनई आणि चौघडा वाजे सप्त सुरात
….रावांचे नांव घेते,….च्या घरात.

लग्नात लागतात हार आणि तुरे
…… च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.

11. Ukhane In Marathi For Female

कपाळावर कुंकु हिरवा चुडा हाती
….रावं माझे पति सांगा माझे भाग्य किती.

चंदनी पानात मुग्ध कळी हसली
…… रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.

मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा
….रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.

रुपेरी सागरावर चंदेरी लाट
…… रावांचं नाव घेते सोडा माझी वाट.

संसार रुपी वेलीचा गगनात गेला झुला
….रावांचे नांव घेते आशीर्वाद द्यावा मला.

अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस
…रावांच नांव घेतांना कसला आला आळस

परसात अंगण अंगणात तुळस
…… नाव घ्यायचा मला नाही आळस.

12. Marathi Ukhane For Girl

पतीव्रतेचे व्रत घेऊन नम्रतेने वागते
रावांचे नांव घेतांना आशीर्वाद मागते.

रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन
……च्या साथीने आदर्श संसार करीन.

 वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल
….रावांचे जीवनात टाकले मी पाऊल

हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे
……मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे

घातली मी वरमाला हसले ….राव गाली
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

इंग्रजीत म्हणतात मून
……. चं नाव घेते ……ची सून.

जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन
घडविले देवानी ….रावांना जीव लावून.

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात
……. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.

13. Marathi Ukhane Lagnatil Naav Ghene

धरला यांनी हात वाटली मला भिती
हळूच म्हणाले ….राव अशीच असते प्रिती.

आवडतं सर्वांना पुढचं पाऊल
……. चं नाव घेते कुंकू लावून.

नववधु आले मी घरी जीव माझा गेला बावरुन
….रावांनी मारली हाक शिणच गेला निघुन.

चांदीच्या ताटात गाजराचा हलवा
…….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.

हृदयात दिले स्थान तेव्हा दिळा हातात हात
….रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.

चांदीचे जोडवे पतीची खूण
…… रावांचे नाव घेते ……ची सून.

नव्हती कधी गाठ मेट एकदाचं झाली नजरा नजर
आई-वडील विसरले ….रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा
…… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

14. Ukhane In Marthi For Marriage

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार
…. रावांनी घातला मला मंगळ सुत्राचा हार.

आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर
……. याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर.

पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा
….रावांनी आणला मला मोग-याचा गजरा.

बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध
……. रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.

चांदीचे जोडवे पतीची खुन
…रावांचे नांव घेते ….ची सुन.

वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान
…….. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!

दारी होता टेबल त्यावर होता फोन
….रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं कौन..?

लग्नाचा वाढदिवस करू साजरा
…….. तुला आणला मोगऱ्याचा गजरा.

15. Marathi Ukhane For Wedding

काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन
…….च्या साह्याने सुखी झाले जीवन.

अक्षता पडताच अंतरपाट होतो दूर
…… रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले ……सांगतात सनईचे सूर..!

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी
……. सोबत मी सुखी आहे सासरी. 

अंगणी होती तुळस तुळशीला घालत होती पाणी
आधी होती आई बाबाची तान्ही आता आहे रावांची राणी.

फुलासंगे मातीस सुवास लागे
……. रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे. 

गुलाबाचे फुल दिसायला ताजे
….रावांचे नांव घेते सौभाग्य माझे.

दही साखर तूप
…… राव मला आवडतात खूप. 

डाळिंबाचे झाड पानोपानी दाटले
….रावांचे नांव घेतांना आनंदी मला वाटले.

16. Marathi Ukhane Naav Ghene

मंद आहे वारा संथ चाले होडी
परमेश्वर सुखी ठेवो ……आणि माझी जोडी. 

ओल्याचींब केसांना टावेल द्यां पुसायला
….रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला

शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड
…… चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड. 

डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल
….रावांच्या नावाने कुंकु लावते लाल

धरला यांनी हात वाटली मला भीती
हळूच म्हणाले ……राव अशीच असते प्रीती. 

अंगणात होती मेथी पाणी घालु किती
….रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.

एका वर्षात असतात महिने बारा
…….. च्या नावात सामावलाय आनंद सारा. 

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी
….रावांचे नांव घेते ….च्या दिवशी.

17. Ukhane Marathi New

यांचं आणि माझं नातं घट्ट आहे
जसं फेव्हीकॉल आणि ग्लू
आमच्या Anniversary डेट मात्र यांना नसतो क्ल्यू. 

वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस
….रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस

तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट
पण बघता बघता ……याच्या प्रेमात पडली माझी विकेट. 

शरदाचे संपले अस्तीत्व वसंताची लागली चाहूल
….रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल

सूर हवा तर ताल हवा
ताल हवा तर सूर हवा
……. रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा…?

गृह कामाचे शिक्षण देते माता
…..रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरीता

मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार
…….. च्या स्पर्शाने उमटले झंकार..!

18. Marathi Ukhane Download

दीन दुबळ्यांचे गाऱ्हाणे परमेश्वरानी ऐकावे
…..रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे

पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती
……. रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..!

पावसाळ्याचा धुंद वारा छेडीतो माझ्या अंगाला
…..रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.

झाली प्रभात..विहंग उडाले गात
…….. रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ..!

चंदेरी सागरात रुपेरी लाटा
…..रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा

दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी
……. रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.

मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध
…….. सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद !

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
…… रावांचे नाव हळूच ओठी येई.

नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे
…..रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

19. Marathi Ukhane For Bride

सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण
……… रावांचे नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण.

संसाराच्या सागरात प्रेमाची होडी
……. रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतली उडी
…..रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सुत्राची जोडी.

…..रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.

पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल
….रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल

तळहातावर मेंदी रचली त्यावर तेल ही शिंपडले
रावांचे मन मी केव्हाच जिंकले.

केसात माळते रोज मी गुलाबाचे फुल
…..राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.

संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा
……. रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.

मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले
…..रावांचे हेच रुप मला फार आवडले.

हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी
…….,रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी.

आज सारे सुख माझ्या दारी दाटले
….रावांचा प्रेम अजुन तरी नाही आटले

पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी
…….. मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

20. Ukhane In Marathi For Bride

मला गुणवान पती मिळाले याचा वाटतो प्रत्येकीला हेवा
…..राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा

आतून मऊ पण बाहेर काटेरी साल
…….. दिसले खडूस तरी मन मात्र विशाल.

सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा
…..रावामुळेच लागला मला त्याचा लळा

सासरची छाया माहेरची माया
……..राव आहेत माझे सर्व हट्ट पुरवाया.

शिक्षणाने विकसीत होते संस्कारीत जीवन
……रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन

इंद्र धनुष्यात असतात सप्तरंग
रावांच्या संसारात मी आहे हंग.

आई ने केले संस्कार बाबांनी केले सक्षम
…….. सोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम.

निळ्या नभात चंद्राचा प्रकाश
…..रावांवर आहे माझा विश्वास.

दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची
……… च नाव घेते सून मी …… ची.

प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे
…..रावांच्या साथी साठी माहेर सोडावे लागे.

मोगऱ्याचा सुगंध पावसाळ्यातील मृदगंध
………. शी जुळले आता रेशमी ऋणानुबंध.

प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची
…..रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.

best marathi ukhane for bride

आई बाबांनी केले लाड सासू सासऱ्यांनी पुरवली हौस
…….. च नाव घ्यायला मला येते फारच मौज.

चंद्राचा झाला उद्य अन् समुद्राला आली भरती
…..रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती

नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार
…..रावांचा स्वभाव आहे फारच उदार

विद्येचा नसावा अभिमान श्रीमंतीचा नसावा गर्व
…….. रावांच नाव घेते ऐकताय ना सर्व.

Also Visit and Enjoy
funny marathi comments

करवंदाची साल चंदनाचे खोड
…..रावांचे बोलने अमृतापेक्षा गोड

नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार
…….. रावांचा स्वभाव आहे फारच उदार.

सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
…..रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.

सूर्याच्या किरणांनी उगवली पहाट
…….. रावांमुळे झाली सुखकर प्रत्येक वाट.

वसंतातली डाळ पन्ह देती थंडावा
…..रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.

साताऱ्याचे पेढे नाशिक चा चिवडा
…….. राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा.

सुशिक्षीत धराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले
……रावांशी लग्न करुन सौभाग्यवती झाले.

आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून
…….. रावांचे नाव घेते तुमचा मान राखून.

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात
…..रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.

marathi ukhane for female romantic

नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी
…..रावां सोबत आली मी सासरी.

नाच रे मोरा आंब्याच्या वनात
……… राव भरले माझ्या मनात.

गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट
…..रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट

साजूक तुपात नाजूक चमचा
……. रावांचे नाव घेते द्या आशीर्वाद तुमचा.

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
आता  ……राव माझे आयुष्यभरासाठी जीवनसाथी

प्रेमाच्या छायेत आयुष्य घेते विसावा
……… रावांचे नाव घेते आपला आशीर्वाद असावा.

आकाशाच्या प्रागंणात ब्रह्मा विष्णु आणि महेश
…..रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.

नाजूक अनारसा साजूक तुपात तळावा
…….. रावांसारखा पती जन्मोजन्मी मिळावा.

मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर
…..रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी सौख्य मी विणले
……. रावांच्या साथीने जीवनपुष्प बहरले.

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी
……रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.

smart marathi ukhane female

कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित
……. राव झाले पती हेच माझे पूर्वसंचित.

पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन
……रावांच्या साथीन आदर्श संसार करीन.

कळी हसली फूल फुलले मोहरून आला सुगंध
…….. रावांमुळे जीवनात बहरून आलाय आनंद.

नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद
……रावांचे नाव घेते दया सत्यनारायणाचा प्रसाद

दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी
……रावांचे नाव घेते तुमच्या साठी.

यमुनेच्या काठी ताजमहाल प्रेमाचा
…….. रावांचे नाव घेते मान राखून सर्वांचा.

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात
….रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरवात.

आकाशात शोभतो इंद्रधनुष्याच्या पट्टा
……… रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा.

नदीच्या काठावर कृष्ण वाजवतो बासरी
….रावांच्या सोबत आली मी संसारात.

गुलाबाच्या झाडाला फुले येतात दाट
…..रावांचे नाव घेते सोडा माझी वाट.

गीतात जसा भाव फुलांत जसा सुगंध
……… रावांमुळे मिळाला मला भरभरून आनंद.

शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी
आता ….राव माझे जन्मसाथी

जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
……. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.

मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर
….रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.

गुलाबाच्या फुलांपेक्षा नाजूक दिसते शेवंती
…….. रावांना मिळो दीर्घायुष्य हीच देवाला विनंती.

गोऱ्या गोऱ्या हाथावर रेखाटली मेहंदी
……रावांचे नाव घेण्याची वारंवार येते संधी..

marathi ukhane

काही शब्द येतात ओठातून
 ….चं नाव येतं मात्र हृदयातून.

कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास
मी भरवितो …..ला जलेबी चा घास.

भाजीत भाजी मेथीची ……माझ्या प्रितीची.

पुरणपोळीत तुप असावे साजुक
……आहेत आमच्या फार नाजुक.

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम
….ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
…..च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

सितेसारखे चरित्र लक्ष्मी सारखं रूप
…….मला मिळाली आहे अनुरूप.

गाडीत गाडी डेक्कन क्वीन
…..आहे माझी ब्युटी क्वीन

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
……चे नाव घेतो सर्वजण ऐका.

नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री
…..झाली आज माझी गृहमंत्री.

ukhane in marathi for male

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण
…..चे नाव घेऊन सोडतो कंकण.

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला
सौ …..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा
…..चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार
…..च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.

 श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी
…. च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट
…….चे बरोबर बांधली जीवन गाठ.

पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे
…..चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात
……चे नाव घेतो ….च्या घरात.

टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा
…..चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.

 निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी
…..चे नावं घेतो ….च्या घरी.

smart marathi ukhane male

रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन
……च्या साथीने आदर्श संसार करीन.

 ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल
…….चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर
……माझी सर्वांपेक्षा सुंदर.

एक होती चिऊ एक होता काऊ
……चे नाव घेतो डोक नका खाऊ.

निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान
…..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान

संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका
……चे नाव घेतो सर्व जण ऐका.

उगवला सुर्य मावळली रजनी
……चे नाव सदैव माझ्या मनी

कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास
…… देतो मी लाडवाचा घास.

कोरा कागज काळी शाई
……ला रोज देवळात जाण्याची घाई.

जगाला सुवास देत उमलली कळी
भाग्याने लाभली मला ….प्रेमपुतळी

हत्तीच्या अंबारीला मखमली झुल
माझी नाजुक ….जसे गुलाबाचे फुल.

ukhane marathi for male

सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल
संसार करु सुखाचा ….तु, मी आणि एक मुल

लग्नाचा वाढदिवस करु साजरा
…तुला आणला मोग-याचा गजरा.

जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध
……च्या सहवासात झालो मी धुंद.

उभा होतो मळ्यात नजर गेली खळ्यात
नवरत्नांचा हार ….च्या गळ्यात.

तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल
……चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल.

 प्रसन्न वदनाने आले रविराज
….ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.

 मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट
आणि …..बरोबर बांधली मी आयुष्याची जीवनगाठ.

निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात
अर्धागिनी म्हणुन ……ने दिला माझ्या हातात हात.

सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग
……माझी नेहमी घरकामात दंग.

चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती
…… च्या  दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.

 जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
…..च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने.

marathi ukhane for male funny

मायामय नगरी प्रेममय संसार
…..च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.

राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास
मी देतो ….ला लाडवाचा घास.

जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र
……च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.

जाईच्या वेणीला चांदीची तार
माझी ……म्हणजे लाखात सुंदर नार.

अस्सल सोने चोविस कॅरेट
….अन् माझे झाले लव्ह मॅरेज.

जीवनात लाभला मनासारखा साथी
माझ्या संसार रथावर …..सारथी.

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी
…….च्या जीवनात मला आहे गोडी.

चंद्रला पाहून भरती येते सागराला
……ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.

निळे पाणी निळे डोंगर हिरवे हिरवे रान
……चे नाव घेऊन राखतो सर्वाचा मान.

काय जादु केली जिंकलं मला एकाक्षणात
प्रथम दर्शनीच भरली ……माझ्या मनात

रुप्याचा लोटा सोन्याची झारी
असली काळीसावळी तर …..माझी प्यारी.

marathi ukhane male

सीतेसारखे चारीत्र्य रंभेसारखे रुप
……मिळाली आहे मला अनुरुप.

दारी होते कोनाडे त्यात होती पळी
माझी …… व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.

आंबा गोड उस गोड त्याहीपेक्षा अमृत गोड
….चंनाव आहे अमृतापेक्षा ही गोड.

श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल
…… गेली माहेरी की होतात माझे हाल.

 …… माझे पिता …… माझी माता
शुभमुहूर्तावर घरी आणली ….. ही कांता.

मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा
…… चे नाव घेतो निट लक्ष ठेवा.

आई-वडील भाऊ बहिणी जणू गोकूळासारखे घर
…… च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.

पुढे जाते वासरु मागुन चालली गाय
…… ला आवडते नेहमी दुधावरची साय

संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी
…… मुळे लागली मला संसाराची गोडी

 नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व
…… आहे माझे जीवन-सर्वस्व.

रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे
……ला पाहून चंद्र-सुर्य हसे.

marathi comedy ukhane

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले
…… चं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.

हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात
…… च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.

मातीच्या चुली घालतात घरोघर
…… झालीस माझी आता चल बरोबर.

 शंकरा सारखा पिता अन् पार्वती सारखी माता
…… राणी मिळाली स्वर्ग आला होता.

नभांगणी दिसे शरदाचे चांदणे
……. चे रुप आहे अत्यंत देखणे.

भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज गेले पळून
……. चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.

बहरली फुलांनी निशीगंधाची पाती
……. चे नाव घेतो लग्नाच्या राती.

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल
……. चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल.

आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान
…… चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान.

marathi ukhane for men

देवळाला खरी शोभा कळसाने येते
…… मुळे माझे गृहसौख्य दुनावते.

 देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
…… माझ्या जीवनाची सारथी.

स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान
…… चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान.

काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध
…… सोबत जीवनात मला आहे आनंद.

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा
……. ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.

देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले
…… शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.

 श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण
…… ला सुखात ठेवीन हा माझी पण.

नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड
…… राणी माझा तळहाताचा फोड.

ukhane marathi for male

 नंदनवनात अमृताचे कलश
…… आहे माझी खुप सालस.

देवाला भक्त करतो मनोभारे वंदन
……मुळे झाले संसाराचे नंदन.

भाजीत भाती मेथीची
…… माझी प्रितीची.

दही चक्का तुप
….. मला आवडते खुप.

 हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी
……. झाली आता माझी सहचारिणी.

आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल
……रावांच्या जीवनात …… राहील खुशाल.

आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन
माझ्या नावाच …… करी पुजन.

श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन
…… च्या सोबत आदर्श संसार करीन.

चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा
…… रावाच्या जीवावर …… मारते मौजा.

marathi ukhane for boy

सोन्याची सुंपली मोत्यांनी गुंफली
…….. राणी माझी घरकामाता गुंतली.

फुलांच्या तोरणात आंब्याचे पान
……. च्या नादाने झालो मी बेभान.

कळी हसेल फुल उमलेल मोहरून येईल सुगंध
……. च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद.

परातीत परात चांदीची परात
…… ची लेक आणली मी ……च्या घरात.

……. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल
तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल.

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
……. चे नाव घेतो ऐका देऊन कान.

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी
माझी ……. म्हणते मधुर गाणी.

श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा
आमच्या …… ला आवडतो गरमगरम बटाटेवडा.

पाच बोटातून होते कलेची निर्मिती
……. वर जडली माझी प्रीती.

खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन
आमच्या ……… चं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.

ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली
तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.

marathi ukhane for husband

वादळ आलं पाऊस आला मग आला पूर
……. चं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर.

केसर दुथात टाकलं काजू बदाम जायफळ
…….. चं नाव घेतो, वेळ न घालवता वायफळ.

तू पुण्याची मिसळ मी मुंबईचा वडापाव
लग्नाला हो म्हणायला ……..ने खाल्ला जास्तच भाव.

चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली
पण ……….कडेच होती माझ्या हृदयाची किल्ली.

अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम
…….. चं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम.

काट्यात काटा गुलाबाचा काटा
…….. चं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा
……… ला घास भरवतो वरणभात तूपाचा.

आंबा गोड ऊस गोड त्याहीपेक्षा अमृत गोड
……..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून
……… चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.

हा दिवस आहे आमच्याकरिता खास
……… ला देतो गुलाबजामचा घास.

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा
शोधून सापडणार नाही …….सारखा हिरा.

marathi ukhane funny

समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू
…….राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू

पुरणपोळीत तूप असावे ताजे अन साजूक
………. आहेत आमचे फार नाजूक.

भल्या पहाटे करावी देवाची पूजा
……… रावांच्या जीवावर करते मी मजा.

बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड
……… रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड.

मटणाचा केला रस्सा चिकन केले फ्राय
………. भाव देत नाही किती केले ट्राय.

खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका
ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.

मोबाईलवर एफएम ऐकते कानात हेडफोन लावून
…….. रावांना मिस कॉल देते एक रूपया बॅलन्स ठेवून.

साखरेचे पोते सुईने उसवले
…….. ने मला पावडर लावून फसविले.

आला आला उन्हाळा संगे घामाच्या या धारा
………. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.

साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा
……… राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा.

हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू
मी आहे लंबू आणि …….. किती टिंगू.

marathi ukhane for female funny

केळीचं पान टरटर फाटतं
……….ह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं.

त्यांचा नि माझा संसार होईल सुकर
जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर.

ही पण आहे सुंदर ती पण आहे छान
कोणाकोणावर प्रेम करू मी आहे परेशान.

लग्नानंतर फ्रिडम गेलं जिकडे जा बायको मागे पळते
तुम्ही काय हसता राव ज्याची जळते त्यालाच कळते.

कॉलेजमध्ये असताना होते मी याची दिवानी
याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी.

काल होती फ्रायडे नाईट, करून आले मी पार्टी
यांनी दिलं मला लिंबूपाणी कारण नवरा माझा स्मार्टी.

Ind Pak Match मध्ये हा म्हणत असतो Mauka Mauka
याचं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka.

घरच्यांनी हो म्हटल्यावर आम्ही लगेच केला रोका
आता मी त्याची मांजर आणि तो माझा बोका.

ukhane in marathi comedy

Shinchan चा कुत्रा आहे Shiro
याचं नाव घेते मारून त्याच्या हृदयावर Arrow.

मटणाचा केला रस्सा चिकन केले फ्राय
……..भाव देत नाही कित्ती केले ट्राय.

नव्या कोऱ्या रुळांवर ट्रेन धावते एकदम फास्ट
चल …….. पिक्चरला सीट पकडू लास्ट.

चांदीच्या ताटात ……..चे पेढे
…….. माझे हुशार बाकी सगळे वेडे.

चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी
…….. माझी गरीब गाय बाकी सगळ्या म्हशी.

शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा
…….. माझी म्हैस आणि मी तिचा रेडा.

बाजारातून घेऊन येतो ……… ताजी ताजी
…….. शी गुलूगुलू करायला मी नेहमीच राजी

हँगओव्हर उतरवायला उपयोगी पडते लिंबू
…….. एवढी हॉट असताना ऑफिस मध्ये कशाला थांबू.

marathi ukhane funny

गोव्यावरून आणले खास फेणी आणि काजू
…….. चा पापा घ्यायला मी कशाला लाजू

…….. ची बाटली आणि काचेचे ग्लास
…….. सोबत असताना क्वार्टर होते लगेच खल्लास.

लिपस्टिक वाढवते …….. ची ब्यूटी
त्याची टेस्ट घेणं ही माझी आवडती डयुटी.

गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डुलू
दिवसभर सुरु असते …….. चे गुलूगुलू

गरम गरम भाजीबरोबर नरम नरम पाव
…….. राव आहेत बरे पण खातात खूपच भाव.

हिरव्या हिरव्या साडीला भरजरी काठ
…….. रावांच्या खोड्या सुरु जरा वळली की पाठ.

बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड  गोड
……… रावांना डोळे मारण्याची फार जूनी खोड.

उखाणा घ्या म्हटलं की उखाणा काही सुचत नाही
कोणाकोणाचं नाव घेऊ माझंच मला कळत नाही.

ukhane in marathi funny

संडासच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून
…….. रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून

 थोरातांच्या दुधावर येते जाड साय
……… ना जन्म देणरी धन्य ती माय.

जीवन आहे एक अनमोल ठेवा
…… आणतात नेहमी सुकामेवा.

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक
……… आहेत आमचे फार नाजुक.

अत्रावळ पत्रावळ पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
……… हसतात गोड पण डोळे वटारायची भारीच खोड.

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा
……… ना आवडतो गरम गरम बटाटेवडा. 

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.

कपाळावर लावले कूंकू लाल लाल
……… च्या जीवावर आहे मालामाल.

funny ukhane in marathi

सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड
……… चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड.

 पाणीपुरी खाताना लागतो जोरदार थसका
……… ला आवडते बिस्कीट ब्रिटानिया मस्का चस्का.

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
……… ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.

वड्यात वडा बटाटावडा
…….. मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.

आकाशात चकाकतात तारे
समुद्रात झळकतात मोती
……. नी बनवलंय मला सौभाग्यवती. 

हिरव्या-हिरव्या कुरणी चरत होती हरणी
…….. चे नाव घेते सासुबाई च्या चरणी.

marathi vinodi ukhane

कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर, 
कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर, 
…… रावांनी शालू आणला नवा  कोर. 

…….. चा नि माझा संसार होईल सुकर
जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर. 

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
…… तर आहेत माझ्या डाव्या खिशात.

 झेंडूचे फुल हल्ते डुलु डुलु
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु.

marathi ukhane for makar sankranti

तिळगुळाच्या संक्रातीला जमतो स्वादिष्ट मेळा
…… चे नाव घ्यायची हीच तर खरी वेळा.

सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ
…… चे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.

गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी
……..चे नाव घेते तिळसंक्रांतीच्या दिवशी.

तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात
……. चं नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.

पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते
चातकपक्षाची काया
……. रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात
सासू सासऱ्यांची माया ..!

marathi ukhane for pooja

ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी
…… चे नाव घेते ……च्या दिवशी.

दत्तदिगंबराला औदुंबराची सावली
पूजेच्या दिवशी नाव घेते
…… रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.

आईवडील आहेत प्रेमळ सासूसासरे आहेत हौशी
…… चं नाव घेते बारशाच्या दिवशी.

जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण
…… चे नाव घेते
गृहप्रवेशाचे
मंगळागौरीचे
सत्यनारायणाचे
डोहाळेजेवणाचे
कुठलेही असो कारण.

सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन
…… माझा हीरो मी त्याची हिरॉईन

नाकात नथ
पायात जोडवी
पैठणी नेसले लक्ष्मीसारखी
कानात कुड्या
हातात पाटल्या
बांगड्यामध्येच किणकिणती
वेणीत खोपा
नऊवारी साडी
कपाळी चंद्रकोर कोरलेली
भांगात कुंकू
हातात तोडे
गळ्यात चंद्रहार मनी शोभतो
साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते
आणि …… चं नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते…

मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी
…… चं नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी.

modern marathi ukhane

ढीगभर चपात्या किती पटापट लाटतेस
…….. तू मला सुपरवूमन वाटतेस.

पोळीचे नकाशे बनवणं ही ……..ची कला
त्यानेही बनवल्या गोल तर भाव कोण देणार मला..?

…….. च्या बाईक वर …….. दिसतो एकदम फिट
बोलू दे लोकांना आपण आपले जाऊ डबल सीट.

मंथ एन्ड आला की Work  Load ने जीव होतो हैराण
…….. सोबत वेळ न मिळाल्याने Life होते वैराण.

बेचव लाईफ झाले टेस्टी प्रेमाची मजा चाखून
……… शी तासंतास गप्पा मारतो अनलिमिटेड प्लॅन टाकून

मंथ एन्ड आला की भरपूर वाढते काम
ऑफिस मध्ये बॉस आणि घरी ……… कटकट करते जाम.

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली
…….. आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली.

smart marathi ukhane male

लग्न झालं की नाव घेणं हा जणू कायदा
तुमची होते करमणूक पण आमचा काय फायदा….?

कधीही फोन केलात तरी लाईन लागेल व्यस्त
…….. च्या प्रेमात मी बुडलोय जबरदस्त.

उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग
…….. माझी नेहमी Whatsapp मध्ये दंग.

मिळून काम केल्यावर कामं होतात लवकर
मी चिरते भाजी आणि …….. लावतो कुकर.

माझ्या …….. चा चेहरा आहे खूपच हसरा
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे क्षणामध्ये विसरा.

तिची नि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफूल
………. माझी आहे खरंच कित्ती ब्युटीफुल…!

इस्त्री केल्यावर कॉलर राहते एकदम ताठ
माझ्या …….. चे केस सिल्की बाकी सगळ्यांचे राठ.

दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते
………. च्या एका स्माईल ने दिवसभराचे टेन्शन पळते.

Final Word

We hope you like and enjoy this marathi ukhane for female collection.
If you want to express your thoughts and feelings on social media then Use this status to show your expression on social media.
So don’t forget to share this marathi ukhane for male with your friends and family on WhatsApp and Facebook.
If you have any suggestions for us then comment below and give me your valuable feedback for better improvement.

Leave a Comment